जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 19 November 2026

महात्मा फुले द्विजन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला मुदतवाढ

 


 

ऑनलाइन नोंदणी 30 नोव्हेंबर, तर निबंध सादरीकरणासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत

 

गोंदिया, दि. 19 :  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निबंध सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना निबंध सादर करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे.

या स्पर्धेत पदवी गटासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह : सामाजिक क्रांतीची नांदी’, तर पदव्युत्तर गटासाठी महात्मा फुले यांची विचारधारा आणि समकालीन सामाजिक आव्हाने’ हे विषय निश्चित करण्यात आले ओत. दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पदवी गटात प्रथम क्रमांकासाठी 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार 500 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धकांनी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. निबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत स्वहस्ताक्षराने लिहिणे आवश्यक आहे. स्वहस्ताक्षराने लिहिलेल्या निबंधाची पीडीएफ प्रत 31 डिसेंबर 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरील प्रोग्राम’ विभागात अपलोड करावी.

स्पर्धेसंबंधी सविस्तर सूचना, अटी व शर्ती तसेच कार्यपध्दतीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://dbaspratishthan.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

00000000

No comments:

Post a Comment