कृषि पंपधारक ग्राहकांची आर्थिक स्थिती तसेच कृषि
ग्राहकांच्या वीज बिलाचा भरणा कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमध्ये सवलत देण्यासाठी राज्य
शासनाने मुख्यमंत्री कृषि संजीवनी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री
राजकुमार बडोले यांनी केले आहे.
या योजनेमध्ये सर्व कृषि पंपधारक उपसा जलसिंचन
योजनेसहीत या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील. जून 2017 चे त्रेमासिक
चालू वीज देयक 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी भरुन या योजनेत सहभागी होता येईल.
शेतकऱ्यांकडून नियमाप्रमाणे थकबाकी वसूल करण्याची वेळ येवू नये यासाठी जास्तीत
जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
31 मार्च 2017 अखेरीस असलेली वीज बिलाची मूळ
थकबाकी पुढील प्रमाणे हप्त्यात भरावयाची मुभा राहील. ग्राहकांची मूळ थकबाकी 30
हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती दहा समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड
महिन्याच्या कालावधीत भरणा करणे आवश्यक राहील. जर मुळ थकबाकी 30 हजार रुपयांपेक्षा
कमी असल्यास ती पाच समान हत्यामध्ये प्रत्येक तीन महिन्याच्या कालावधीत भरणा करणे
आवश्यक राहील. ज्याप्रमाणे दहा किंवा पाच हप्ते कृषिग्राहक वेळेवर भरतील
त्याचप्रमाणात कृषिपंप ग्राहकांचे व्याज व दंडनीय आकार माफ करण्याबाबत शासन विचार
करेल. या योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मार्च 2017 अखेरची मुळ थकबाकी 31 मार्च
2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक राहील. या योजनेत
सहभागी झालेल्या कृषि ग्राहकांना 1 एप्रिल 2017 नंतरची सर्व चालू वीज बिले
पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ
घ्यावा.
No comments:
Post a Comment