गोंदिया, दि.29 : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या
संपन्न असून निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. प्रत्येकाने सकारात्मक
दृष्टीकोन ठेवून काम करावे. प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका
नेहमी असली पाहिजे. दीड वर्षाच्या कार्यकाळात सारस फेस्टीव्हल, लाईफ लाईन
एक्सप्रेस, कायापालट उपक्रम आपण यशस्वीपणे राबविले असून इथल्या नागरिकांनी,
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रेमामुळे गोंदिया जिल्हा माझ्या कायम मनात राहील.
असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी
यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून केंद्र सरकारमध्ये बदली
झाली. यानिमित्ताने अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने 28 सप्टेबर रोजी
बाहेकर लॉन गोंदिया येथे आयोजित निरोप समारंभात सत्काराला उत्तर देतांना डॉ.सूर्यवंशी
बोलत होते.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, बिरसी
विमानतळ प्राधिकरणचे व्यवस्थापक सुभाष प्रजापती, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते,
अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील, अधिकारी-कर्मचारी
समन्वय समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले, भंडारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.रवि धकाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.शाम निमगडे, डॉ.दिपक बाहेकर, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन यांची यावेळी
प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले,
प्रशासनात काम करतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून
मनापासून जबाबदारीने काम केले पाहिजे. विकासाच्या बाबतीत सातत्याने सहकार्य
करण्याची भूमिका जिल्हावासीयांची दिसून आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य
समन्वय साधण्याचे काम अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून होत असल्याचे
गौरोदगारही त्यांनी काढले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले,
जिल्हाधिकारी यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू आहे. त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी
आहे, ते जिथे जातील तिथे आपली छाप पाडतील. आपले ऋणानुबंध असेच कायम राहतील असेही
त्यांनी सांगितले.
डॉ.भुजबळ म्हणाले, प्रशासनाचा
प्रमुख म्हणून विधायक दृष्टीकोन ठेवून जिल्हाधिकारी यांनी काम केले. त्यांनी
आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवे उपक्रम राबवून यशस्वीपणे काम केले
आहे. त्यांची पुढील वाटचाल अशीच कायम राहो अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
गोंदियातील अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती म्हणजे गोंदियाची एकता आहे. जिल्ह्यात
ऑफिसर्स क्लब होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.प्रजापती म्हणाले, जिल्हाधिकारी
यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एखादे उपक्रम
किंवा अभियान राबवितांना ते दूरदृष्टीकोन ठेवून काम करतात. त्यांच्यात अष्टपैलू
वृत्ती आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.सूर्यवंशी यांनी,
होश वालो को खबर क्या, गोंदिया क्या चीज है...
गोंदिया आयीए, सारस देखिए... अशी गझल म्हणून सर्व उपस्थितांची मने जिंकली.
डॉ.पुलकुंडवार यांनी, एक
अजनबी हसीनासे यु मुलाखात हो गयी... हे गीत तर डॉ.भुजबळ यांनी, आकाशी झेप घे रे
पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा... हे भावगीत सादर केले.
यावेळी गोंदिया येथून
स्थानांतरण झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, नव्याने जिल्ह्यात रुजू
झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप
पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.शाम निमगडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा उपनिबंधक संदीप
जाधव यांचेही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला निवासी
उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल
देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम व राजेश देशमुख, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) उल्हास नरड, विभागीय वन अधिकारी श्री.कातोरे, सहायक वनसंरक्षक
श्री.शेंडे, कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, केटीएसचे
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परियाल, नेत्रतज्ज्ञ डॉ.राजेंद्र अग्रवाल, सेवानिवृत्त
सहायक वनसंरक्षक अश्वीन ठक्कर, विनोद चौधरी, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे
अधीक्षक डॉ.संजीव दोडके, उपविभागीय अधिकारी के.डी.मेश्राम, तहसिलदार अरविंद हिंगे,
डॉ.काळे, डॉ.जयस्वाल, उपविभागीय अभियंता संजय कटरे, सुबोध कटरे, लेखाधिकारी श्री.बाविसकर,
कार्यकारी अभियंता विलास निखारे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिलीप अग्रवाल,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे, डॉ.मनोज राऊत, डॉ.विनोद जायसवाल,
समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, शाखा अभियंता गोवर्धन बिसेन, सांख्यिकी अधिकारी
श्री.राऊत, दुलीचंद बुध्दे, विस्तार अधिकारी श्री.लिचडे, विठ्ठलराव भरणे, लिलाधर
पाथोडे, तुलसीदास झंझाड यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी भंडारा येथील डॉ.चेतन
राणे यांनी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डी.यु.रहांगडाले यांनी केले. संचालन दुलीचंद बुध्दे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार
लिलाधर पाथोडे यांनी मानले.
00000

No comments:
Post a Comment