जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 16 October 2019

गोंदिया व तिरोडात सकाळी 7 ते सायं 6 तर अर्जुनी/मोर व आमगावात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान

     येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ, 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ,65- गोंदिया विधानसभा मतदारसंघ, 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्हयातील 63- अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघ आणि 66- आमगाव विधानसभा मतदारसंघ हे नक्क्षलग्रस्त भागामध्ये येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आहे. तर 64- तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि 65- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत आहे.  या चारही विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या वेळेची  नोंद घ्यावी. जास्तीत जास्त संख्येने 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

No comments:

Post a Comment