जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 16 October 2019

21 ऑक्टोबर रोजी चार विधानसभा मतदारसंघात 10 लक्ष 98 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क


                                                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019


      विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील 10 लक्ष 98 हजार मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 5 लाख 45 हजार 404 पुरुष, 5 लाख 52 हजार 862 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

            अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 27 हजार 102 पुरुष,  1 लाख 25 हजार 488 स्त्री आणि 1 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 52 हजार 591 मतदार, तिरोडा विधानसभा क्षेत्रात 1 लाख 27 हजार 291 पुरुष, 1 लाख 30 हजार 57 स्त्री आणि 3 तृतीयपंथी असे एकुण 2 लाख 57 हजार 351 मतदार, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 1 लाख 57 हजार 614 पुरुष, 1 लाख 64 हजार 187 स्त्री असे एकुण 3 लाख 21 हजार 798 मतदार आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात 1 लाख  33 हजार 397 पुरुष आणि 1 लाख 33 हजार 133 स्त्री मतदार असे एकुण 2 लाख 66 हजार 530 मतदारांचा समावेश आहे.              
          जिल्हयातील  दोन  विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत 9 हजार 339 स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे. यामध्ये तिरोडा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 2 हजार 766 स्त्री मतदार आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा 6 हजार 573 स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे.
           जिल्हयात 31 ऑगस्टपर्यंत 10 लाख 96 हजार 441 मतदार होते. 1 सप्टेंबर 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आयोजित मतदार नोंदणी अभियानात 1 हजार 829 मतदारांची वाढ झाली. आता एकुण मतदारांची संख्या 10 लाख 98 हजार 270 इतकी आहे. 

No comments:

Post a Comment